Share this book with your friends

ASHRU AND AATHAVANI / अश्रू आणि आठवणी

Author Name: Mrs. Supriya Rakesh Lad | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

 ही एक छोटीशी प्रामाणिक इच्छा  आहे—काही निवडक कविता एकत्र करून त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याची. या कवितांमधून व्यक्तिचित्रण, बालकविता, सामाजिक जाणीव आणि उणीव, स्वगत, गरजेच्या वस्तूंचे शब्दरेखाटन, तसेच कोरोना काळातील अनुभव अशा विविध विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.“अश्रू आणि आठवणी” हा संग्रह म्हणजे भोवतालच्या प्रसंगांचा, व्यक्तींचा—अबालवृद्धांचा, नात्यांचा, वस्तूंचा आणि भावभावनांचा शब्दांतून रेखाटलेला आलेख आहे.

हे सगळं कधी जाणूनबुजून घडलं, कधी नकळत… पण या प्रक्रियेत मला भावनांना व्यक्त करण्याचं एक अतिशय सुंदर साधन मिळालं. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत जादुई, भारावून टाकणारा आणि मनाला समृद्ध करणारा ठरला.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

5 out of 5 (1 ratings) | Write a review
sidhishwarr N Rindhe

Delete your review

Your review will be permanently removed from this book.
★★★★★
This is an excellent book in marathi poems. It doesn’t seem to be 1st attempt. I liked every bit of it.

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

सौ. सुप्रिया राकेश लाड

 सौ. सुप्रिया राकेश लाड या समकालीन मराठी कवयित्री आपल्या संवेदनशील लेखनातून समाजातील
विविध पैलूंना उजाळा देतात. त्यांची कविता मानवी नात्यांचे, मातृभूमीप्रेमाचे, तसेच जीवनातील संघर्ष
आणि सौंदर्याचे दर्शन घडवते.
साहित्य परिचय
● रेडिओ सहभाग: FM Radio Puneri Awaz 107.8 वरील RJ कैलास यांच्या “हा खेळ शब्दांचा”
कार्यक्रमात सहभाग.
● कविता: सावली, नाते बहिण भावाचे, सृष्टी, शौर्य या कवितांद्वारे जीवनातील विविध भावविश्वाचे

दर्शन.
● ऑनलाईन काव्यसंमेलन: साहित्य संपदा आयोजित विश्वविक्रमी ऑनलाईन काव्यसंमेलनात
Facebook Live वर स्वरचित कविता सादर.
● पुरस्कार: YouTube Live स्वानंद फुलोरा द्वारे कवयित्री शांताबाई शेळके यांच्या “हे विश्व प्रेमिकांचे”
या कवितेच्या वाचनासाठी उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार.
● प्रकाशन: स्वरचित कविता ‘राजमाता जिजामाता’ विश्वमराठी परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित.
● शैक्षणिक सादरीकरण: जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडी येथे Google Meet द्वारे
“माती आणि नाती जपणारी कविता” या विषयावर सादरीकरण (१३ सप्टेंबर २०२०).
● स्पर्धा सहभाग: विविध काव्यलेखन स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग; पाऊस, माणूस, नाते बहिण भावाचे
या विषयांवर लेखन.
● विशेष पुरस्कार: ‘मातृभूमी’ कवितेसाठी विशेष पुरस्कार.
● प्रस्तावना लेखन: तेजोनिधी पुस्तकासाठी प्रस्तावना (Book on Veer Savarkar).
● डिजिटल प्रकाशन: रानपाखरांची शाळा (Digital मासिक), रयतेचा वाली (Digital शैक्षणिक दैनिक)
यांतून स्वरचित कविता प्रकाशित.
● लोकजागृती: लातूर-भूकंप व लोकजागृती या वृत्तपत्रांतून Google Meet कार्यक्रमाची बातमी
प्रसिद्ध.
साहित्यिक योगदान
सौ. सुप्रिया राकेश लाड यांच्या कवितांमध्ये नात्यांचे जिव्हाळे, मातृभूमीप्रेम, सामाजिक जाणिवा आणि
जीवनातील सौंदर्य यांचे दर्शन घडते. त्यांच्या लेखनातून मराठी कवितेला नवे आयाम लाभले असून, विविध
माध्यमांतून त्यांनी आपली साहित्यसंपदा वाचकांपर्यंत पोहोचवली आहे.

Read More...

Achievements

+5 more
View All