Share this book with your friends

Krishnakhyan / कृष्णाख्यान Mahamanav Krishnache Charitra

Author Name: Mahesh Naik | Format: Paperback | Genre : Religion & Spirituality | Other Details

महाभारताची अनेक रहस्ये या कथानकातच दडलेली आहेत. थोडेसे बारकाईने वाचले, एकमेकांशी जोडले तर याचे संदर्भ आपल्याला लागतात व यातील बऱ्याचश्या घटनांभोवती असलेले चमत्काराचे आवरण गळून पडते व आपल्याला अनेक रहस्यांचा उलगडा होतो. अशा अनेक रहस्यांतील काही रहस्ये “महाभारताचा रहस्यभेद” या माझ्या मालिकेद्वारे शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे. “कृष्णाख्यान” हे त्यापैकी पहिले पुस्तक. यात कृष्णाच्या आयुष्याकडे चिकित्सक वृत्तीने पहात, त्याच्या आयुष्यातील चमत्कार वगळून, त्याच्यातील महामानव शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

हरिवंश व महाभारताकडे आपण जर डोळसपणे पाहिले तर या महामानवाच्या मोठेपणाला कोणत्याही चमत्कारांची आवश्यकता नाही, हे आपल्या सहज लक्षात येऊ शकते आणि त्याच दृष्टिकोनातून हे कृष्णाख्यान लिहिले गेले आहे. येथे उलगडते ते मानवी कृष्णाचं संपूर्ण आयुष्य आणि आपल्यापुढे उभं राहातं ते महामानव कृष्णाचं एक आगळंवेगळं रूप. चाणाक्ष, हुशार, शूर, बुद्धिमान , धोरणी, राजकारणी महामानव कृष्ण.

कृष्णाचा जन्म जसा गूढ, तसा त्याचा मृत्यूदेखील. त्याला भगवानपदावर नेणाऱ्या असंख्य भक्तांनी मग त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटनेवर मग चमत्कारांची अनावश्यक पुटं चढविली. ही जर बाजूला काढली तर आपल्यासमोर उभा राहतो तो महामानव कृष्ण. कृष्णावर प्रेम करणाऱ्या असंख्य कृष्णप्रेमींना त्याचं हे मानवी स्वरूप नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

Read More...
Paperback
Paperback 350

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

महेश नाईक

महेश नाईक, व्यवसायाने अभियांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) असून त्यांनी मुंबईतील राष्ट्रीय रसायन व उर्वरक ( RCF ) या भारत सरकारच्या उपक्रमात व कतार शेल (Qatar Shell GTL) या ऊर्जा संयंत्रामध्ये मिळून सुमारे ३२ वर्षांहून अधिक काळ, अधिकारी पदावर काम केलेले आहे. भारतीय इतिहासाची आवड, देशविदेशातील भटकंती, खगोलशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय. खगोल मंडळ, या मुंबईतील हौशी खगोल अभ्यासकांच्या सर्वात मोठ्या व जुन्या संस्थेचे अध्यक्षपद देखील त्यांनी ६ वर्षे भूषविले आहे. 

छत्रपती शिवराय व महाभारत हे त्यांच्या खास आवडीचे विषय. त्यामुळेच लवकर सेवानिवृत्ती घेत त्यांनी या विषयांच्या, विशेषतः महाभारताच्या अभ्यासाला वाहून घेतले आहे. महाभारत हा  काल्पनिक ग्रंथ नसून तो आपला इतिहास आहे आणि म्हणूनच त्याच्याकडे वस्तुनिष्ठ भूमिकेतून पाहायला हवे या दृष्टीकोनातून ते महाभारताचा अभ्यास करतात आणि त्यातून त्यांना गवसला तो चमत्कारांची आवश्यकता नसलेला कृष्ण. 

अधिक माहितीकरिता : https://maheshnaik.com

Read More...

Achievements

+4 more
View All