आणि यमक जुळले हा कविता संग्रह वेगळ्या शैलीत लिहिला गेला आहे तसेच सर्वांना समजेल आणि भावेल अशा साध्या सोप्या भाषेत लिहिलेला आणि प्रत्येक वयातील व्यक्तींना आपलासा वाटेल असा आहे. मनाला स्पर्श करणाऱ्या ओळी अनेक भावनांना उजाळा देतात. नाती, संस्कृती, भक्ति, प्रेम, मैत्री दर्शवणाऱ्या कविता आणि त्या सोबतच एक नवीन विचार आणि प्रेरणा देणाऱ्या कवितांचा समावेश या पुस्तकात आहे . "पेपरला जाताना" सारख्या काही कविता हसवतील तर "चतकोर भाकर" , "छप्पर" सारख्या काही कविता डोळ्यात पाणी आणतील. शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या कविता, एक प्रेरणादायी लेख आणि शेवटी एक उत्सुकता निर्माण करणारा पुढील पुस्तकाचा एक प्रसंग सुद्धा या संग्रहात समाविष्ट आहे. बालपण, शाळेतील दिवस, कॉलेज, गाव, शहर सगळीकडून सफर करवणारा हा कविता संग्रह पुन्हा पुन्हा वाचू वाटेल,आणि काहीतरी नवीन वाचल्याचा अनुभव येईल.
हा कविता संग्रह Amazon आणि Flipkart वर सुद्धा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी मेल करा : marathiyug.community@gmail.com
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners