शिक्षण : एस्सी. ॲग्री., महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
नोकरी : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कृषी अधिकारी या पदावर अहिल्यानगर जिल्ह्यात कार्य केलेले आहे.
काव्य लेखनः इयत्ता सातवी पासून कविता लिहिण्यास सुरुवात केली. शालेय जीवनात असताना अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन, परभणी येथे काव्य वाचनात सहभाग घेतला होता. लोकमत व इतर वर्तमानपत्रात कविता प्रकाशित झालेल्या आहेत. महाविद्यालयीन जीवनात विविध ठिकाणी काव्य वाचनात सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या 'जाऊ देवाचिया गावा' मासिकात बऱ्याच कविता प्रकाशित झालेल्या आहेत. पहिला काव्यसंग्रह 'इंद्रायणी 2017 मध्ये प्रकाशित केला. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ, नासिक यांच्या वार्षिक स्मरणिकेत कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
सध्या कार्यरत : ऑक्टोबर 2008 पासून इस्कॉन नाशिक येथे वैदिक साहित्याचे व भक्तिमय जीवन प्रणालीचे पूर्ण वेळ प्रचारक म्हणून स्थायिक झालेले आहेत. नाशिक येथील विविध कॉलेजमधील तरुणांना व गृहस्थ भक्तांना मार्गदर्शन करतात. YouTube, Facebook आणि Instagram च्या माध्यमातून भगवद्भीता, श्रीमद् भागवत व अन्य वैदिक ग्रंथांवर आधारित कविता व चारोळ्या द्वारे प्रचार करतात.