विविध विषयांवरील कविता या कविता संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कवियत्री स्वरांजली चवरे यांनी एका प्रियसीची आपल्या प्रियकराला दिलेली साद शब्दबद्ध केली आहे, तर कवि चेतन ढोणे यांनी गणितावर खूपच छान कविता रेखाटली आहे. कवियत्री आम्रपाली भोसले यांनी आपल्या कवितेतून खूप छान असा सामाजिक संदेश दिला आहे.कवि प्रा. अमित शिंदे दोन दिवाळ्या या कवितेतून सामाजिक दुरीचे रेखाटन करतात तर तू लढत रहा या कवितेतून, मानसिकरित्या खचलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात. कवि भरत चौधरी हे; आपल शिक्षण, लढता लढता आणि मराठी आमची या कवितांमधून खूप काही शिकवून जातात. कवियत्री सुमांशी शेंडे यांनी प्रेमाला निर्बंध नसते तसेच देवाचा शोध या कवितेतून अतुलनीय सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय तर कवियत्री सुप्रिया मंडलिक यांनी रानामधली माय या कवितेतून कष्टकरी मातेचा संघर्ष रेखाटला आहे सोबतच चाँद तरोडकर यांनीही विविध विषयांवरील कविता खूपच चांगल्यारीतीने रेखाटल्या आहेत.