“हा ब्रम्हांड असंख्य रहस्यानी भरलेला आहे. रहस्यं जी विचारांच्या, कल्पनेच्या रुपाने मनुष्याच्या डोक्यात भिरभिरत असतात. ज्यांना आपण तत्वज्ञान म्हणतो. जोपर्यंत ही रहस्यं तत्वज्ञानात असतात सुरक्षित असतात. ज्या क्षणी मनुष्य त्यांना वास्तवात उतरवतो त्यांचं विज्ञान बनतं आणि मग त्यावेळी ही रहस्यं, रहस्यंही राहत नाहीत आणि सुरक्षित ही राहत नाहीत, कारण विज्ञानाला मनुष्य हवं तसं बदलु शकतो, हवं तसं वळवु शकतो. माझं काम त्या रहस्याना सुरक्षित ठेवण्याचं आहे. कुठल्याही स्थितीत, कुठल्याही परिस्थितीत.”- सत्त्या
“ज्यांच्या नशिबात विजयाचा शाप असतो, ते विजयोत्सव साजरा करत नाहीत.”- देवांशी
“स्वप्नांसाठी करावा लागणारा संघर्ष आणि जीवंत राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यात फरक आहे. एक तुम्हाला जगण्याचं कारण देतो, तर दुसरा.. मरणाचं.” - निशा
“मला माहीत आहे बऱ्याचदा आशा खोटी असते, वेडी असते, पण तरी आपल्याला ती हवी असते. आपल्याला ती हवी असते हार न माणण्यासाठी, लढण्यासाठी, आपल्याला ती हवी असते स्वत:ला सावरण्यासाठी. केवळ काही काळापुरती, आपल्या कठिण काळापुरती.” – मेघना
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners