एकपात्रिका आणि एकांकिका!!
"नाटकाचा आवड लहानपणापासूनच. शाळेत असताना छोट्या छोट्या नाटिका सादर करण्यात फार मजा यायची. पण, रंगमंचावर प्रवेश करणं कधीच जमलं नाही. पुढे, दहावीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मला 'मावळा' होण्याचा मान मिळाला. माझ्यासाठी ते सोन्याहून पिवळे असे होते. त्यानंतर, अनेक लहानसहान कार्यक्रमात सहभागी होत गेलो.
हे सर्व घडत असताना नाटक- एकांकिका लिहिणं असा विचार मनात कधीही आला नाही. किंबहुना, तशी संधीही कोणी फारशी दिली नाही. मग याचदरम्यान 'झी मराठी' च्या झी मराठी दिशा या साप्ताहिक वृत्तपत्रात छोट्या छोट्या कविता सादर केल्या. त्यांना छानसं व्यासपीठ मिळालं. इतकंच नाही, तर एका स्पर्धेत मला प्राइजही मिळाले. पण, नाटक लिहिणं म्हणजे नेमकं काय असतं हे अजूनही कळलं नव्हतं.