“एक तारा होण्याचं स्वप्न मनाशी घेऊन निघालीय ती, आयुष्याच्या प्रवासाला ! ना कशाची चिंता, ना कशाची फिकीर, डोळ्यात मात्र फक्त एक स्वप्न ! आयुष्य जगण्याचं, यश मिळवण्याचं, ध्येयापर्यंत जाण्याचं, स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचं !”
मी, तेजश्री विजय देशपांडे. सध्या बॅचलर ऑफ कॉमर्स च्या पहिल्या वर्षात शिकतेय. सातवीत असल्यापासूनच कविता लिहीण्याचा छंद मी जोपासला आहे. ‘कविता’ हे मला व्यक्त होण्याचं उत्तम माध्यम वाटतं ज्यात भाव आहेत, शृंगार आहे, भाषेची सुंदरता आहे. याच कवितेचं हे माझं पहिलं पुस्तक, माझं छोटंसं व महत्वाचं स्वप्न. आज ते पूर्ण होताना पाहून खूप आनंद होतो आहे अन् थोडीशी हुरहूरही आहेच. पण हे स्वप्न पूर्ण होण्यामागे असलेला माझा अगदी लहानसा पण हक्काचा वाचकवर्गच कारणीभूत ठरतो. ‘गरूडझेप’ ही काव्यशृंखला आपल्याठायी अर्पण करताना तिला तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद मिळो हीच इच्छा.