वर्हाडी बोलीतील विनोदी कथाकार संजय महल्ले यांचा ‘गावगप्पा’ हा बेचाळीस स्फूट गोष्टींचा संग्रह आहे. गावाच्या पारावर, चौका-चौकात किंवा घराच्या ओसरीत होणार्या गप्पांतून मानवी स्वभावाचे, वर्तनाचे विविध पापुद्रे सहजपणे उलगडून दाखविले आहेत.
महाराष्ट्राच्या वर्हाड प्रांतातील ‘वर्हाडी’ ही मराठीची प्रमुख बोली आहे. या वर्हाडी बोलीची नाळ वर्हाडी कथाकार संजय महल्ले यांनी पकडली असून ते उत्तम दर्जाच्या विनोदी कथांतून व्यक्त होताना, वर्हाडीचे नैसर्गिक सौंदर्य जपताना दिसतात. मानवी स्वभावाचे विविध पदर उलगडणार्या या गावगप्पा मनोरंजनाबरोबरच वाचकाला स्वत:ला तपासायला, अंतर्मूख व्हायला लावतात.
माणसाच्या दैनंदिन जगण्यातला विनोद, स्वभावातील वैचित्र्य टिपणे हे संजय महल्ले यांचं खास वैशिष्ट्य आहे. ते अस्सल वर्हाडी बोलीतील विनोदी कथालेखक आहेत आणि विनोद हेच त्यांच्या कथेचे आशयसूत्र आहे.
- डॉ. संजय लोहकरे
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners