"हळद आणि हडळ - एक भयकथा" हि खेडेगावातील लग्न समारंभावर आधारित काल्पनिक भयकथा असून प्रसंग आणि वर्णन प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहेत. मुलीचे लग्न जमल्यापासून घडणारे अनेक प्रसंग कथेमध्ये आणि हडळीचे लग्नघरात वास्तव्य असल्यास काय घडू शकते याचा खूप चांगला समतोल साधला आहे. कथेचा पहिला भाग शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवणारा आहेच. कथेच्या दुसऱ्या भागात लग्नसमारंभ, प्रेम, भय, द्वंद्वव, धावपळ, चमत्कार अश्या अनेक प्रसंगाची गुंतागुंत सोडवताना प्रकृतीसुद्धा कुणावर अन्याय होऊ देत नाही अशी परिणामकारक रचना अनुभवायला मिळते.