इरा, विराज त्या विस्तीर्ण तळ्याकडे बघतच राहिले. किती सुंदर तळे होते ते. त्यात कमळे फुलली होती. कमळांवर चतुर उडत होते.
तळ्याच्या मधोमध एक बेट होते, हिरव्यागार झाडांनी भरलेले. त्या हिरव्या पसाऱ्यातून मंदिराचा कळस डोकावत होता. इतके सुंदर दृश्य होते. दोघे मंत्रमुग्ध होऊन बघत राहिले.
"आपण आहोत कुठे नक्की? पुण्यातच आहोत ना?" त्यांना प्रश्न पडला.
हो, ते होते पुण्यातच, पण १८व्या शतकात......
ते तिथे कसे पोहोचले?
आपले शहर आत्ता आहे असेच कायम होते का? काय कळेल त्यांना?
ह्या भूतकाळाच्या सफरींत आणखी काय काय रहस्य उलगडतील?
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners