आज मला बोलायचयं, काहीतरी असं जे आपण निर्धास्तपणे चार लोकांत नाही बोलु शकत. प्रत्येकजण आपापली नाती जपण्यात हरवला आहे. काळाबरोबर बदलणारी नाती आपल्या सर्वांनाच पहायला मिळत आहेत. माझ्या या कथेतही तुम्हाला बदलत्या नात्यांच्या छटा अनुभवायला मिळतील. समाजाने प्रेमाबद्दल घडवलेली लक्षमणरेखा या कथेत ओलांडलेली तुम्हाला आढळेल. प्रेम-भावना चुकीच्या किंवा बरोबर नसतात. प्रेम तर प्रेम असतं. सहा आयुष्यांची जुगलबंदी अनुभवायला तयार व्हा! चला तर मग या माझ्यासोबत जुगलबंदीच्या ह्या अनोख्या सागरात हरवुन जायला.