कृषी उद्योजकतेची सुवर्णसंधी - शेतकरी उत्पादक कंपनी
शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत काम करतांना आम्हाला आलेले अनुभव माहितीच्या स्वरुपात या पुस्तकातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यात एफपीसी नोंदणी करण्यासाठी समोरून येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे व गैरसमज देखील दूर केलेले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना व अनुदान या विषयी माहिती दिलेली आहे आणि कंपनीने वर्षभरात विविध कायद्यांतर्गत करावयाच्या पाठपुराव्यांसाठीची माहिती देखील दिलेली आहे.
या पुस्तकात शेतकरी उत्पादक कंपन्यांना आवश्यक असलेली व्यवहार्य, वास्तवदर्शी आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. शेतकरी बंधूंना एफपीसी नोंदणी करून त्याअंतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ व सवलती मिळावेत आणि त्यांचे उद्योग-व्यवसाय सुरु व्हावेत, व यशस्वीपणे चालावेत आणि शेतकरी बंधूंच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा अॅफेसरचा उद्देश आहे.