आर. जे. कॉलेजात असतानाच कविता करण्याचा खरंतर योग आला. दोन मराठी आणि एक हिंदी कविता अशा एकूण तीन कविता मी कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये सादर केलेली. त्याचवेळी माझ्या मित्राने, राहुलनेही त्याची एक हिंदी कविता सादर केली होती. मग हळूहळू आम्ही दोघांनीही एकत्र कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि, मग त्यातूनच पुढे माझा पहिलावहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला, ज्याचं नाव आहे.. संधिप्रकाशातून!!
मागील वर्षीच माझे 'छंद अभंगाचा' हे अभंगाचे (दुसरे) पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाचे प्रकाशन स्वतः आमच्या अमोल पंडीतसरांनी आणि डॉ. सोमनाथसरांनी केले. मग पुढे या पुस्तकाचे सगळीकडेच बरंच कौतुक झाले. आणि, अजूनही यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ज्यासाठी मी आपला सर्वांचा सदैव ऋणी राहील.
या वर्षीचा हा माझा दुसरा कवितासंग्रह, ज्याचं नाव आहे.. माझ्या डायरीतून!! यात एकूण पंधरा कवितांचा संग्रह केला असून मला आशा आहे की, तुम्हाला हा कविता संग्रह नक्की आवडेल.
धन्यवाद!
आपला, आदित्य कदम.