मी जरी केवळ शून्य ( स्मृती गावंडे बाबांच्या ) हा काव्यसंग्रह माधव जाधव यांनी संपादित केला आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहातील कवितेमधून सद्य जीवनदशेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न बाबाराव गावंडे यांनी केलेला दिसून येतो. या काव्यसंग्रहाचे सामाजिक - आर्थिक - आध्यात्मिक दृष्टीने खोलवर अभ्यास करणाऱ्याला जीवनातील अनेक पैलूंचे दर्शन घडेल व ह्या कविता अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करतील असेच अभ्यासकाला वाटेल, अन नवी प्रेरणा मिळेल. आपल्या हृदयातील ऊर्मी जागृत होईल असा विश्वास वाढत गेला तर नव्या पिढीतील युवक युवती कार्यशील होऊ शकतील. म्हणून, या काव्यसंग्रहाचे वाचन करावे असे सुचवावेसे वाटते.