बालपण हे मुळातच खूपच सर्जनशील असते. मुलांना प्रत्येक गोष्टी ची कल्पना असते, छोट्या मोठ्या स्वरूपात ते
पालकां समोर मांडत असतात. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर असतेच असे नाही पण त्यांच्या विचारांवर आपण
मोकळेपणाने चर्चा करू शकतो . प्रत्युषा आठ आणि प्रणम्य चार वर्षांचा आहे. या एकंदरीत आठ वर्षात आमच्या
झालेल्या काही गप्पा मी येथे आपणा समोर मांडत आहे.