Share this book with your friends

My childhood in Burambewadi / बुरंबेवाडीतील माझे बालपण

Author Name: Mr. Sharad Yashvant Nawale | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

हे पुस्तक म्हणजे अनेक तासांच्या विचारमंथनानंतर शब्दांत मांडलेल्या असंख्य विचारांचे संकलन आहे. जरी शैली आणि शीर्षक अस्पष्ट आणि अपरिभाषित असले तरी, ते पुस्तकात बनवण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला वाटत असलेल्या किंवा नसलेल्या जवळपास सर्व गोष्टींबद्दल लहान संदेश देणे. एपिफनीच्या अशा क्षणांमध्ये आपला दृष्टीकोन विस्तृत करण्याची आणि अधिक सुंदर बनण्याची शक्ती असते.

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

श्री.शरद यशवंत नवाळे

मनोगत.

कोकणातील निसर्गरम्य अशा देवाचे गोठणे गावातील बुरंबेवाडीमध्ये  माझा जन्म झाला. बुरंबेवाडीमध्ये  निसर्गरम्य सौंदर्य मी नुसते अनुभवले नाही तर मी बावीस वर्षे त्या मातीत खेळलो, रमलो,जगलो आणि बालपणीचे सुख -दु:ख काय असते ते मी स्व:ता माझ्या डोळ्यांनी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले आहे.बावीस  वर्षे बुरंबेवाडीमध्ये  घालवतांना तिथे राहून जो मोलाचा कानमंत्र मी माझ्या वाडीतील वडीलधाऱ्या माणसांकडून घेतला आणि शिकलो तो कधीही न विसरण्याजोगा आहे .

राजापूर तालुक्यात माझी बुरंबेवाडी अगदी सौंदर्याने नटलेली सजलेली आहे.नद्या, नाले, आंबा, फणस, काजू, करवंद तोरणे जांभळे, आणि नारळ पोफळीच्या बागा अशी असंख्य खाद्य फळे माझ्या बुरंबेवाडीमध्ये  खायला आणि त्याची चव चाखायला मिळते.मी बुरंबेवाडीमध्ये  बालवयात मित्राच्या सोबतीने जे अनुभवले तेच मी या माझ्या पुस्तकात मांडण्याचा आठोकाठ प्रयत्न केला आहे.मी मित्रांच्या संगतीने खेळलेला खेळ असो,वा मित्रांसोबत खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या दगडावर किंवा खणीवर आंब्याच्या पाळावर बसून केलेल्या गप्पा -गोष्टी ,भांडणे -फिरणे आणि माझ्या बालपणीच्या वयात आनंदात घालवलेले सणवार असोत की त्या त्या सणवारांना केलेल्या कलाकृतीचा अनुभव असो हे सर्व मी या माझ्या पुस्तकात अगदी ठामपणे मांडले आहे.बुरंबेवाडीतील माझे बालपण हे माझे पुस्तक अनुभवाचे लेखन आहे.हे पुस्तक मी वाचकांच्या हातामध्ये वाचायला देतांना मला खूप आनंद होत आहे.मी या अगोदर "सुक्या झाडाला मोहोर " हे कवितासंग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.आणि हे माझे पहिलेच पुस्तक असल्याने त्यात काही त्रुटी राहिल्या असल्यास माफी असावी.

Read More...

Achievements

+2 more
View All