तुम्हालाही वाटते का तुमच्या मुलांनी तुमचे ऐकले पाहिजे?तुम्हालाही वाटते की, तुमच्या मुलांचे मोबाईल मधील लक्ष कमी होऊन योग्य ज्ञान मिळवण्याकडे मुलांच लक्ष केंद्रीत व्हावं?असे काय संस्कार केले की, तुमची मूल नक्कीच योग्य मार्गांनी यशस्वी होतील?आजच्या फ़ास्ट जगात तुमच्या मुलांना संस्कार देण्याचा जलद आणि सोप्पा मार्ग तुम्हाला माहीत आहे का?मग कोणत्याही वयोगटातील मुले असू द्या. तुम्हाला ही वाटते का आई बाबा आणि मूल यांच्यात वाद न होता, सुसंवाद व्हावा? तुम्हालाही वाटते का, आई बाबा आणि त्यांची मुल यांना एकमेकांचे म्हणणे समजले पाहिजे?
जेव्हा लेखिकेने तिच्या आजूबाजूच्या इतर आई बाबांना पहिले, तेव्हा तिला जाणवले की, आजच्या फ़ास्ट जगात लोक मुलांवर संस्कार करणे तर दूरच राहिले, पण पालकांची त्यांच्या मुलांशी अशी वागणूक होती की, जणू त्यामुळे त्यांची मुलांच्या मानसिकतेवर नक्कीच वाईट परिणाम होत होता.पालक मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी त्यांच्या मुलांशी असे वागत होते. जणू त्यामुळे ते त्यांच्या नकळतपणे मुलांच्या आत्मविश्वासावर घाव घालत होते.
आपल्या मुलांशी संवाद तर दूरच…त्यांच्यातील संवादच दिसेनासा झाला होता. ते बघून तिला तिच्या बाबांनी केलेले संस्कार डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखे गेले.पालक आणि मुल यांचा मधील गैरसमज दूर होऊन कायम घट्ट प्रेमळ नाते निर्माण होण्यासाठी आणि आपल्या मुलावर सोप्या पद्धतीने कमी वेळातही उत्तम संस्कार करण्याची जणू उत्तम मार्गदर्शक पुस्तिका आहे.
प्रत्येक आई बाबांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजेच.हे पुस्तक वाचले की, तुम्ही त्यांना सहजपणे समजून घेऊ शकता, त्यांच्यावर प्रेम करू शकता आणि त्यांना पाठिंबा देऊ शकता.