Share this book with your friends

Pest Management in Vegetable Crops / भाजीपाला पिकावरील कीड व्यवस्थापन शेतकऱ्यांची समृध्दी व सर्वांसाठी आरोग्यमय जीवन

Author Name: Dr. Baswaraj Bhede | Format: Paperback | Genre : Others | Other Details

विविध भाजीपाला पिकावर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव नियमित आढळून येतो, तर काही किडी ठराविक हंगामात आढळून येतात. परंतु सध्या अनेक भाजीपाला पिके बिगरहंगामी व वर्षभर घेतली जात असल्यामुळे  किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. रासायनिक कीटकनाशकाचा अविवेकी व अतिरिक्त वापरामुळे अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागत आहे. अलीकडील काळात हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. त्यामुळे किडीच्या प्रादुर्भावावर, मित्र कीटकावर आणि कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीवर त्याचा परिणाम होत आहे.  दुय्यम किडी प्रमुख किडी म्हणून सामोऱ्या येत आहेत आणि नवीन किडीचा प्रादुर्भावदेखील आढळून येत आहे. कोणत्याही किडीच्या व्यवस्थापनासाठी किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार, जीवनक्रम व व्यवस्थापनाच्या विविध पद्धती या बाबीची माहिती असणे आवश्यक आहे. सदरील पुस्तकामध्ये विविध भाजीपाला पिकावरील वेगवेगळ्या किडींची सविस्तर माहिती दिली आहे.

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

डॉ. बस्वराज भेदे

डॉ. बस्वराज भेदे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कृषी कीटकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. विविध संशोधन व विस्तार प्रकल्पातून शेतकऱ्यापर्यंत कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान पोहचविले आहे. तसेच शेतकर्‍यांच्या मार्गदर्शानासाठी त्यांनी अनेक प्रकाशने प्रकाशित केली व अँड्रॉईड मोबाईल अँप निर्माण केले आहेत.

Read More...

Achievements

Similar Books See More