पाच मुले आणि एक पुरातत्वशास्त्रज्ञ. ते एका कामगिरीवर आहेत. कसल्या शोधात आहेत ते? खजिन्याच्या? प्राचीन शहराच्या?
त्यांना हे जग आहे त्यापेक्षा सुंदर बनवायचे आहे.
‘पिवळ्या दाराच्या पांढऱ्या घराची गोष्ट’ ही सेपियन्सची पहिली धाडसी कामगिरी, ह्या शृंखलेतील पहिले पुस्तक. सोसायटीतली वाळलेली पाने जाळणे बंद करण्यात आपली सेपियन गॅंग यशस्वी झाली.
ह्या मुलांबरोबर इतिहासात डुबकी मारायची? की विज्ञानात? त्यांच्या ह्या धाडसी कामगिरीत तुम्हाला सामील व्हायचे आहे?
चला तर मग.