रंग या कवितेला फार उत्तम प्रतिसाद मला मिळाला , त्या कवितेला प्रथमदर्शनी ठेवून मी हे पाऊल उचलले. एका छोट्याशा एकपात्री अभिनयातुन मला ही प्रेरणा मिळाली. कविता मुळातच जन्म घेते , तिला लिहता येत नाही असं मला प्रकर्षाने वाटत. वीज आकाशातुन सरसरत धरणीला जशी मिठी मारते तशी कविता कागदावर उतरते असं मला वाटत.