सुनयना. कित्येक कलांमध्ये पारंगत असलेली सुनयना. संगित, आयुर्वेद, युद्धकला, शस्त्रकला, तत्वज्ञान या सर्व क्षेत्रांमधिल तज्ञ असलेली सुनयना. मात्र तरीही जी ओळख तिला मिळायला हवी ती कधीच मिळाली नाही. आपण तिला ओळखतो. मात्र या सर्व कलांसाठी नाही ज्यामध्ये ती पारंगत होती. आपण तिला ओळखतो ते वेगळ्याच कारणासाठी. तिच्या आयुष्यावर एक नविन प्रकाश टाकण्यासाठी आपण तयार आहोत का? तिचे आयुष्य तिच्या नजरेतून पाहण्यासाठी आपण तयार आहोत का?
दिनेश सोनी शिक्षणाने ह्युमन रिसोर्स मधिल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यांना मानसशास्त्र, मानववंशशास्त्र व पौराणिक कथांच्या अभ्यासात विशेष रस आहे. त्यांनी विविश विषयांवर अनेक वेळा व्याख्याने दिलेली आहेत व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूर शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अधिव्याख्याते म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी विविध तांत्रिक विषयांवर १५ पेक्षा आधिक पुस्तके लिहीलेली आहेत. मात्र मानववंशशास्त्र व पौराणिक कथांच्या अभ्यासात असलेल्या विशेष रसाने त्यांने पौराणिक कथा लिहीण्यास प्रवृत्त केले आहे.