"देवाचे गोठणे" हे पुस्तक लिहिणारे, श्री. शरद यशवंत नवाळे यांचे मी प्रथम कौतुक करतो. मी पुस्तक वाचताना बऱ्याच गोष्टींचा या पुस्तकातून काही ना काही नवे जुने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. व त्याप्रमाणे माहितीही दिली गेलेली आहे. तसे पहाता देवाचे गोठणे हा अनेक वाडीनी तयार झालेला मोठा गाव आहे.त्यामुळे अनेक वाड्यांचा परिचयही वेगवेगळा असू शकतो. तेथील वाडीतील कोणी ना कोणी आपल्या परिचयाचा उपयुक्त असे काम केलेले असणारच यात शंका नाही. परंतु हे सारे अजमावणे व आणणे जिकरीचेच आहे. तरी हा काही श्रमपूर्वक प्रयत्न श्री.शरद नवाळे यांनी केले आहेत, असे दिसते. प्राचीन ते अप्राचीन देवदेवींचे महात्म्य मांडण्याचा चांगला प्रयत्न दिसत आहे. देव ,देवस्थाने यांची माहिती, सड्यावरील शिल्पे यांच्या उल्लेखामुळे आपल्याच बांधवांना आपल्या गावाचे महात्म्य कळण्यास मदतच होईल. तसेच आपल्या घराण्याच्या कुळाचे महत्त्वही कळेल. दिसा मासी काही लिहावे, चांगले ते जना सांगावे .हाच श्री शरद नवाळे यांचा प्रयत्न दिसून येत आहे.