Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
आराध्य दिवाळी अंक २०२१, हा सर्वत्र भारतात उपलब्ध आहे. अस्सल महाराष्ट्राचा मराठी दिवाळी अंक. ज्यात १४ कथा, लघुकथा आणि अनुभव असून एक उत्कृष्ठ दिवाळी अंक इतर दिवाळी अंकांच्या तोडी
आराध्य दिवाळी अंक २०२१, हा सर्वत्र भारतात उपलब्ध आहे. अस्सल महाराष्ट्राचा मराठी दिवाळी अंक. ज्यात १४ कथा, लघुकथा आणि अनुभव असून एक उत्कृष्ठ दिवाळी अंक इतर दिवाळी अंकांच्या तोडीसतोड उतरेल ह्यात काहीच शंका नाही. ह्या अंकातील सर्व साहित्य रचना मराठी संस्कार आणि मराठी अस्मिता यालाच धरून मांडली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, आकाश कंदीलाच्या मंद उजेडात, उटणाच्या गंधात आणि फराळाच्या चवी चवीने कथा मैफिली वाचूया नी दिवाळी पहाट मनात रंगवूया. नवीन नात्यांना, अनुभवांना आणि नवीन साहित्याला आपलेसे करूया.... आराध्य साहित्य संग्रहा तर्फे हा प्रकाशित केलेला दुसरा दिवाळी अंक असून अत्यंत उस्फुर्त प्रतिसाद वाचकांकडून मागील वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मिळत आहे. हा दिवाळी अंक इतर दिवाळी अंकापेक्षा काहीसा वेगळा आहे. त्यात जाहिरातबाजी नाही, इतर विषयांतर करणारे विषय नाहीत. तर त्यात आहेत केवळ कथा आणि साहित्य. मागच्या वर्षी २०२० मधील दिवाळी अंकासाठी लिहिणारे जे लेखक / लेखिका होते. त्यातील काही ह्यावर्षी देखील नवीन कथांचा नजराणा घेऊन आपल्यासाठी आले आहेत. तर नवीन लेखक मंडळींची देखील भर ह्यात आहे. यंदा देखील आम्हाला भरभरून कथा साहित्य आले. पण इतके सारे साहित्य प्रकाशित करणे शक्य नसल्याकारणाने आराध्य साहित्य संग्रह टीम द्वारे काही ठराविक आणि निवडक लेखकांची निवड करून त्यांचेच साहित्य ह्या दिवाळी अंकासाठी छापले आहे
मी लेखक अमोल साळवे. प्रथमतः मी सर्व वाचक मंडळींचे आभार मानतो की त्यांनी मला आराध्य साहित्य संग्रहाच्या मार्फत माझ्या कथांना व कवितांना दिलेल्या प्रतिसादामुळे मला पुढे लिहिण
मी लेखक अमोल साळवे. प्रथमतः मी सर्व वाचक मंडळींचे आभार मानतो की त्यांनी मला आराध्य साहित्य संग्रहाच्या मार्फत माझ्या कथांना व कवितांना दिलेल्या प्रतिसादामुळे मला पुढे लिहिण्याची प्रेरणा दिली. माझ्या या प्रवासामध्ये माझ्या आयुष्यात जे जे लोक आले व ज्यांच्यामुळे मी काहीतरी लिहू शकलो त्या सर्वांचे मनभरून आभार मानतो.
माझ्या या पहिल्या पुस्तकामध्ये मी आतापर्यंत लिहिलेल्या माझ्या काही मराठी व हिंदी कविता व कथा आपल्याला वाचायला भेटतील.
आराध्य साहित्य संग्रहाच्या, टीमच्या वतीने आम्ही आराध्य शब्दशिल्प हा विशेषांक प्रकाशित केला आहे. मला तुमच्या हाती देऊन खूपच आनंद होत आहे. ११ लेखक-लेखिकांनी मिळून रचलेला हा १५ स
आराध्य साहित्य संग्रहाच्या, टीमच्या वतीने आम्ही आराध्य शब्दशिल्प हा विशेषांक प्रकाशित केला आहे. मला तुमच्या हाती देऊन खूपच आनंद होत आहे. ११ लेखक-लेखिकांनी मिळून रचलेला हा १५ साहित्य संख्या असलेला, एकूण ३७७६५ शब्द संख्या असलेला एक विशेषांक नसून एक ग्रंथच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या विशेषांकाच्या निमित्ताने आम्हाला अश्या दुर्मिळ लेखक आणि लेखिकांचे, कवी आणि कावियात्रिंचे साहित्य संपन्न झाले की ते प्रकाशित करण्यावाचून आम्हाला गत्यंतर नव्हते. तुमच्या सदैव स्मरणार्थ राहतील ह्यात तीळमात्र शंका नाही. "आराध्य शब्दशिल्प" ह्या २०२१ मधील दुसरा विशेषांक. हा विशेषांक खास "अक्षय तृतीया" १४ मे २०२१ च्या मुहूर्तावर तुमच्या भेटीस आला आहे. हा विशेषांक मराठी वाचकास नक्किच नवीन प्रेरणा देऊन जाईल. तसेच दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आराध्य शब्दशिल्प विशेषांक प्रकाशित होण्याची सातत्यता सुरू राहील.
आराध्य घोस्ट स्टोरीज हा त्रैभाषिक विशेषांक असून हा २५००० हुन अधिक शब्द संख्या असलेला भयकथा संग्रह आहे. त्यात पहिली कथा इंग्रजी मध्ये आहे. WHO IS THERE?! - Author : Sally Sason ह्यांनी त्यांच्या मंत्
आराध्य घोस्ट स्टोरीज हा त्रैभाषिक विशेषांक असून हा २५००० हुन अधिक शब्द संख्या असलेला भयकथा संग्रह आहे. त्यात पहिली कथा इंग्रजी मध्ये आहे. WHO IS THERE?! - Author : Sally Sason ह्यांनी त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शब्दांतून वाचकाला नक्कीच खिळवून ठेवेल ह्यात तिळमात्र शंका नाही. कथा वाचून झाल्यावर देखील मनात बराच वेळ तेच प्रसंग डोळ्यासमोर रेंगाळत राहतात हा अनुभव आम्हाला आला तू तुम्ही वाचकांनी देखील नक्की घ्या.
कथा: खूनी चण्डालन - लेखक : देवेन्द्र प्रसाद [हिंदी कथा] ह्या हिंदी कथेत लेखकाने अत्यंत जागृत आणि भयानक प्रसंग हुबेहूब जिवंत केले आहेत. ह्या कथेतील गूढ आणि रहस्यमय रचना, मांडणी यातून कथा प्रत्यक्ष समोर घडतेय याचा प्रत्येय येतो.
झोपाळा - लेखिका: तेजल भोईटे [मराठी कथा] हि एक थरारक कथा असून कथा वाचून अंगावर काटा येतो. अप्रतिम कल्पनाशक्ती आणि उत्कंठा वाढवणारी भयकथा आहे.
अमावस्या - लेखिका: चैत्राली सुमेश चिनकटे [मराठी कथा] हि कथा उत्तम मांडणी आणि उत्कृष्ट कथानक यासाठी नक्कीच वाचकांना खिवळून ठेवेल.ह्या कथेत प्रसंग फारच थरारक आणि कुठेही न थांबता अगदी शेवटपर्यंत वाचकाला घाबरवून सोडते.
फरसाण - लेखक : नितेश ठोकळ [मराठी कथा] ह्या कथेत एकूण कथेचे ८ भाग आहेत. त्यातील ६ भाग आराध्य साहित्य संग्रह ऍप मध्ये पूर्वप्रकाशित केले आहेत. पण भाग ७ आणि ८ हे केवळ ह्या विशेषांकातच प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच कथा एक हिवाळी रात्र - लेखक : नितेश ठोकळ [मराठी कथा] हि देखील तितकीच भयानक आणि रोमांचकारक आहे जितकी बाकीच्या कथा आहेत. खिडकी - लेखक: नितेश ठोकळ [मराठी कथा] ह्या कथेत खिडकी प्रकरण काय आहे ते जरूर वाचा.
आराध्य दिवाळी अंक २०२० हा तब्बल ८९ कथा, कविता आणि लेखांचे साहित्य ह्या दिवाळी अंकासाठी प्रकाशित झाले आहे. ह्या दिवाळी अंकात हास्य विनोदी कथा, लेख, पाककृती, विनोद यांनी युक्त त
आराध्य दिवाळी अंक २०२० हा तब्बल ८९ कथा, कविता आणि लेखांचे साहित्य ह्या दिवाळी अंकासाठी प्रकाशित झाले आहे. ह्या दिवाळी अंकात हास्य विनोदी कथा, लेख, पाककृती, विनोद यांनी युक्त तर, प्रेम कथा-कविता, वैचारिक साहित्य, गावरान कहाण्या, भावनिक आणि कौटुंबिक गोष्टी असून सर्व वयोगटातील वाचकांस वाचता येईल अस्सल मराठी दिवाळी अंक आहे.
झपाटलेली बायको हि कथा भयकथा असून ती २२.७ हजार लोकांनी वाचली आहे. ह्या काथेस प्रतीपिली.कॉम वर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच माझ्या इतर कथा देखील तितक्याच दर्जेदार आहेत
झपाटलेली बायको हि कथा भयकथा असून ती २२.७ हजार लोकांनी वाचली आहे. ह्या काथेस प्रतीपिली.कॉम वर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच माझ्या इतर कथा देखील तितक्याच दर्जेदार आहेत आणि लोकांनी वाचून त्या गाजल्या आहेत.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.