Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
महाराष्ट्र राज्यास पर्यटनस्थळांचा समृद्ध वारसा आहे. पर्यटनस्थळांचे सर्व प्रकार महाराष्ट्रात पाहावयास मिळतात. महाराष्ट्रास जसा वैभवशाली इतिहास आहे तसाच वैविध्यपूर्ण भूगो
महाराष्ट्र राज्यास पर्यटनस्थळांचा समृद्ध वारसा आहे. पर्यटनस्थळांचे सर्व प्रकार महाराष्ट्रात पाहावयास मिळतात. महाराष्ट्रास जसा वैभवशाली इतिहास आहे तसाच वैविध्यपूर्ण भूगोलही आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विभाग हे विविधांगी व स्वतःची एक वेगळी संस्कृती जपणारे आहेत. महाराष्ट्रातील अशाच विभागांपैकी दोन विभाग म्हणजे कोकण व पश्चिम घाट. राज्यातील नागरिकांना जेव्हा चार दिवस सुट्टीचे मिळतात तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते हेच दोन विभाग कारण पर्यटकांना आनंद देणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी विपुल आहेत आणि अगदी दोन अथवा चार दिवसांची सुट्टी मिळाली तरी प्रवासात फार वेळ न दवडता या स्थळांची सफर करणे पर्यटकांना शक्य होते. या पुस्तकात सुद्धा कोकण व पश्चिम घाटावरील ठराविक प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आलेला आहे जी पर्यटकांसाठी एकदम अपरिचित नसली तरी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची नव्याने ओळख होईल.
महाराष्ट्राच्या कोकण विभागातल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे एक टुमदार गावं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच कोकण रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्य
महाराष्ट्राच्या कोकण विभागातल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे एक टुमदार गावं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच कोकण रेल्वेवरील एक महत्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावास हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. नागस्थान ते नागोठणे या पुस्तकात महाभारत काळात नागवंशाने वसवलेल्या नागस्थान या गावाचा नागोठणे होण्यापर्यंतचा प्रवास व ऐतिहासीक,भौगोलिक, व्यापारी, आरमारी, पुरातत्व, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, वांशिक वैभवाचा वेध घेण्यात आला आहे. हे पुस्तक नागोठण्याचाच नव्हे तर रायगड जिल्हा व उत्तर कोकणच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे.
मुंबई! भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक बंदरवजा महानगर. मुंबईचा महिमा काय वर्णावा? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर, महाराष्ट्र राज्याची राजधानी, भारताची आर्थिक राज
मुंबई! भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक बंदरवजा महानगर. मुंबईचा महिमा काय वर्णावा? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर, महाराष्ट्र राज्याची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, जगातील पाचव्या क्रमांकाचे महानगर, भारत आणि दक्षिण-पश्चिम-मध्य आशियातील सर्वाधिक वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर, भारताच्या सागरी मालवाहतुकीत ५०% योगदान असलेले एक बंदर आणि भारतीय उद्योगांचे माहेरघर अशी अनेक बिरुदे या शहरास प्राप्त आहेत.
मुंबईचा अज्ञात इतिहास हे पुस्तक पूर्णपणे मुंबईच्या प्राचीन इतिहासावर आधारित असून या माध्यमातून मुंबई हीच प्राचीन कोकणची राजधानी पुरी होती हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे मुंबईच्या प्राचीन इतिहासावरील संशोधनास काही प्रमाणात दिशा मिळेल व भविष्यात अनेक नवे पुरावे हाती लागतील व मुंबई हीच प्राचीन पुरी होती हे सिद्ध होईल अशी आशा आहे. मुंबईचा प्राचीन इतिहास जगासमोर यावा व तिच्या भरभराटीत योगदान देणाऱ्यांची महती सर्वांस समजावी या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिण्यात आले असून मुंबईवर व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.