Share this book with your friends

aani yamak julale / आणि यमक जुळले kavita sangrah

Author Name: Dipak Devidas Sonawane | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

आणि यमक जुळले हा कविता संग्रह वेगळ्या शैलीत लिहिला गेला आहे तसेच सर्वांना समजेल आणि भावेल अशा साध्या सोप्या भाषेत लिहिलेला आणि प्रत्येक वयातील व्यक्तींना आपलासा वाटेल असा आहे.  मनाला स्पर्श करणाऱ्या ओळी अनेक भावनांना उजाळा देतात. नाती, संस्कृती, भक्ति, प्रेम, मैत्री दर्शवणाऱ्या कविता आणि त्या सोबतच एक नवीन विचार आणि प्रेरणा देणाऱ्या कवितांचा समावेश या पुस्तकात आहे .  "पेपरला जाताना" सारख्या काही कविता हसवतील तर "चतकोर भाकर" , "छप्पर" सारख्या काही कविता डोळ्यात पाणी आणतील. शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या कविता, एक प्रेरणादायी लेख आणि  शेवटी एक उत्सुकता निर्माण करणारा पुढील पुस्तकाचा एक प्रसंग सुद्धा या संग्रहात समाविष्ट आहे. बालपण, शाळेतील दिवस, कॉलेज, गाव, शहर सगळीकडून सफर करवणारा हा कविता संग्रह पुन्हा पुन्हा वाचू वाटेल,आणि काहीतरी नवीन वाचल्याचा अनुभव येईल. 

हा कविता संग्रह Amazon आणि  Flipkart वर सुद्धा उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी मेल करा : marathiyug.community@gmail.com

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 179

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

दीपक देवीदास सोनावणे

 दीपक देवीदास सोनावणे, ( पुणे )

जन्म १९९९ पुणे, महाराष्ट्र , २०१७ मध्ये त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजीनीरिंग विषयात प्रथम श्रेणीत पदवी शिक्षण पूर्ण केले. सध्या ते इन्फोसिस या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये सिस्टम इंजीनियर या पदावर काम करत असून मराठी भाषेशी त्यांची नाळ अतिशय घट्ट आहे. त्यांच्या शाळेपासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरवात केली. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी समाज माध्यमातून आणि मासिकातून त्यांच्या कविता इतरांपर्यंत पोहचवण्यास सुरवात केली. हा त्यांचा पहिलाच  कविता संग्रह आहे. कविता आणि कथा लिहिणे ही त्यांची आवड आहे.

Read More...

Achievements