‘अंतरंग’ या कविता संग्रहात मानवी भावभावनांचे मनोहारी चित्रण आहे. विविध आशय-विषयांवरील या कविता वाचकांना आपल्याच कविता भासतील. आनंद, उत्साह, विरह, दुःख, प्रेम, मानवता, चैतन्य अशा संमिश्र भाव-भावनांतून हा कवितासंग्रह साकारला आहे. अगदी बाल-किशोर यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या कवितांचा यात समावेश आहे.