पहिल्यांदाच काश्मीर बघण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा बशीर नावाच्या एका काश्मिरी ड्रायव्हर सोबत हसत खेळत सुरू केलेला प्रवास तिसऱ्या दिवशी पहेलगामहून परत येतांना एका वेगळ्या वळणावर येऊन थांबतो.
अनेक भावनिक, सामाजिक, राजकीय कंगोरे असलेली ही कथा मुळात एक प्रेमकथा आहे.
'अपनी कहानी'...हे हिंदी नाव मराठी कादंबरीला दिले गेले ते मुख्य पात्र बशीर यामुळे! त्यानेच ह्या गाण्याने सुरुवात करीत कथानकाला अगदी सुरुवातीलाच वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले.
वेगवेगळ्या काळातील तात्कालिक, सामाजिक अथवा राजकीय परिस्थितीशी बशीरच्या परिवाराने व इतर काश्मिरी बांधवांनी केलेला सामना अतिशय संयत शब्दात फक्त कथानकाच्या गरजेपुरता वर्णन केलेला असल्याने आपणही आस्वाद घेत कथा सलग वाचत राहतो.
प्रेमकथा असली तरी प्रत्येक भागात कथा जितकी रोमांचक तितकीच उत्कंठावर्धक भासते. अनेक प्रसंगी व कादंबरीचा शेवट होतो तेंव्हाही ही कथा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners