भिंती पलिकडचं जग हा नेहमीच एक कुतुहलाचा विषय असतो. सगळ्यांनीच आपल्या भोवती एक आभासी भिंत बांधून घेतलेली असते. फार निवडक लोकांना त्या भिंतीच्या आत यायला परवानगी असते. त्यामुळेच बाकी लोकांना त्या आभासी भिंतीच्या पलिकडचं जग बघायची उत्सुकता असते.
पण त्या आभासी भिंतीच्या पलीकडचं खरं खुरं जग समजणं सोपं नसतं. मग ते ह्रेट बटलरचं जग असो वा भावना काकूंचं वा दामले गुरूजींचे नाहीतर मूनप्पाचं. हे सगळे लोक खरे खुरे लोक होते. जीवनाच्या वळणावर कुठेतरी भेटलेले. मन