Share this book with your friends

Gosht tashee aleekadachee, kaahee kotee varshaanpoorveechee / गोष्ट तशी अलीकडची, काही कोटी वर्षांपूर्वीची

Author Name: Aditi Deodhar | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

तुम्हाला इतिहास हा विषय कंटाळवाणा वाटतो? आणि भूगोल? रटाळ? 

हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही ह्या दोन्ही विषयांच्या प्रेमात पडाल. मला खात्री आहे. 

असं आहे काय ह्या पुस्तकात? ही आहे गोष्टीत गोष्ट. गोष्ट आहे रोहित, तन्वी, प्रिया आणि मितालीची. ते चौघे एका महत्त्वाच्या कामगिरीवर निघाले आहेत. त्यांना एक गोष्ट लिहायची आहे. 

गोष्ट कशी, तर तिच्यात नाट्य आहे, थरार आहे. अशी गोष्ट की जिची सुरुवात झाली ती शेकडो नाही, हजारो नाही, लाखो नाही तर काही कोटी वर्षांपूर्वी. 

ती गोष्ट आहे एका प्राचीन पर्वताची, त्यातून वाहणाऱ्या नदीची, त्या नदीच्या कुशीत जन्माला आलेल्या एका गावाची. 

ती गोष्ट कुठे लिहिलेली नाही. ती गोष्ट आहे लपलेली, आजूबाजूच्या खडकांत, दगडगोट्यांत, मातीत आणि नदीत. हे दडलेले गुपीत वाचायचे आहे, गोष्ट अलगद सोडवून घ्यायची आहे. 

चौघे ही कामगिरी कशी पार पाडतील? आहे कुठली ही गोष्ट? काही कोटी वर्षांपूर्वीची?

वयोगट: १० आणि पुढे 

Read More...
Paperback

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अदिती देवधर

माझे गणितात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काही वर्षे काम केले. 

आम्ही काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन २०१४ साली जीवितनदी ही लोकचळवळ सुरू केली, ती लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन ह्या उद्देशाने. 

हा विषय मुलांपर्यंत रंजक पद्धतीने पोहोचवता यावा यासाठी, २०१६ पासून ‘नदीची गोष्ट’ सांगायला सुरुवात केली. तीच गोष्ट आज पुस्तक स्वरूपात तुमच्यासमोर सादर करत आहे. 

‘इरा, विराज आणि टाईम मशिन’ हे माझे पहिले पुस्तक. आता हे दुसरे पुस्तक वाचकांच्या हातात देताना मला आनंद होत आहे. 

Read More...

Achievements

+7 more
View All