Share this book with your friends

Namaloom- Kishor Mugal / नामालूम-किशोर मुगल (व्यक्तिजीवन, कविता आणि समीक्षा)

Author Name: Sanjay Yerne | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

   किशोर मुगल नामवंत, तेवढेच लोकप्रिय, रसिकमान्य कवी आहेत. चालू घडामोडी, राजकारणावर व्यंग साधत मिष्कीलपणे विडंबन करणारी तेवढीच माणूसपणाची साद घालणारी त्यांची कविता आहे. किशोरच्या कवितांचा आढावा, शैली, जाणिवा, वैशिष्ट्ये, विषय, आशय, स्वरूप बघता, त्यांची कविता ही काळाच्या कसोटीवरून निश्चितपणे अनंत कालावधीपर्यंत तुकाराम महाराजांच्या अभंगागत जिवंत राहणारी आहे. 

  अंतरंगातून झिरपत जाणारी ही कविता नव्या दमाने उभे राहू पाहणाऱ्या कवींना, रसिकांना, अभ्यासकांना, जाणकारांना यातून मोलाची मदत करणारी आहे.

  एका 'नामालूम' व्यक्तिमत्त्वाला 'मालूम' करणारी त्यांची काव्यमय व्यक्तिजीवनगाथा, निवडक कविता व त्यावरील आस्वादक समीक्षारुपी भूमिका. "नामालूम, किशोर मुगल" या तरल ग्रंथाच्या माध्यमातून.

Read More...
Paperback
Paperback 350

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संजय येरणे

   संजय वि. येरणे हे साहित्यातील प्रसिद्ध नाव. कथा, कादंबरी कविता, समीक्षा, वैचारिक ग्रंथ, बालवाड्.मय अशा साहित्यातील मुशाफिरी, ऐतिहासिक विषयावरील त्यांच्या 'योद्धा' 'यमुना' ह्या कादंबरी प्रचंड गाजलेल्या आहेत. काव्यसमीक्षेच्या क्षेत्रातील "नामालूम, किशोर मुगल"  हे पाचवे सामिक्षाग्रंथ असून त्यांचे आजवर तीसहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. अनेक पुस्तके पुरस्कार प्राप्त ठरली आहेत. 

   काव्यमय व्यक्तिजीवनगाथा, निवडक कविता व त्यावरील आस्वादक समीक्षारुपी भूमिका असे त्रिवेणी संगम साधणारा नाविन्यपूर्ण प्रयोगात्मक ग्रंथ अगदी सर्वांना रसिकाग्न करून जाणारा आहे. 

Read More...

Achievements

+5 more
View All