आणि समोरचा कॅमेरा चालु न करून कित्येक दिवस लोटले असावे. स्वतःचा द्वेष वाटावा एवढी पण विद्रुप मुळीच नाही आपण. पण हल्ली स्वतः दोष देता देता स्वतः ल पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय किती भयानक परिस्थिती. दुःखाच्या जननीला माणूस सहजी सहज लवकर सोडत नाही. माझ्यामते हातावर झेलनाऱ्या माणसात तुम्ही अभिमानाने, स्वाभिमानाने जगू शकता पण कधी समाधानी नाही राहु शकत. समाधान कुठे असेल तर ते फक्त आपल्या माणसांच्या पायात रेंगळण्यात आहे. तिथं आपल्याला सुख वाटत, समाधान मिळत, अति विचारांना कुठेतरी पूर्णविराम नकळत दिला जातो. आपल्याला समोरचा काय समजतो हे त्यांच्या विचारांवर अवलंबून आहे पण आपल्या मनातील निखळ भावना आपल्याला माहिती आहे म्हणून आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना कमी माहिती आहोत. सगळ्यांसमोर स्पष्ट मला पण बोलता येत पण काही मन जपण्याचा नादात आपण शांत असतो. वर्तमान जगण्याच्या नादात आपण भविष्याचा पण विचार केला पाहिजे. आता वेळेचा विरुंगळा म्हणुन प्रेमाची नाटक केली जातात त्यांना पुढे भविष्य आहे का.? हे आपण पाहिलं पाहिजे. आपण या गोष्टी करताना कोणाला फसवतोय हे एकदा स्वतः ला विचारलं पाहिजे आपण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला पाहिजे फक्त आजचा विचार न करता दुर दृष्टिकोन ठेवला पाहिजे.