सामान्य लेखकाची असामान्य कहाणी.....
प्रेमाची व्याख्या करू शकेल अशा कवीला अजुन जन्माला यायचे आहे. प्रस्तुत काव्य संग्रहामध्ये माझा हा एक मोडका तोडका प्रयत्न.
प्रेम नसते असे, असेल वारा तसे वाहत जावे
परी वाऱ्याच्या झुळकी, प्रीत मनी मंद मी व्हावे
आठवणीच्या गावात या प्रेम पुरातील माणस लेखिन बद्ध करतांना कित्येक कोवळ्या भावनांना साद घालुन कित्येक रसाळ नयन अश्रु पुसुन कित्येक मोडकी हृदये जोडुन कित्येक प्रेम कविनांना मांडण्याचा हा एक यज्ञ. प्रेमाला लफड्याचे नाव देणाऱ्याने एकदा श्री कृष्ण लिला एकदा वाचलीच पाहिजे. लव्ह जिहादच्या नावाखाली माणुसकीचा गळा कपणारे धर्म रक्षक कशे काय ठरवु शकतात.
प्रेम एक अथांग सागर आठवणीच्या गावातून पाण्यातल प्रतिबिंब वाऱ्याची झुळूक ती असावी आणि या सारख्या अनेक कवितांची एक साधी मांडणी सदरील काव्य संग्रहामध्ये सादर करण्याचा हा छोटा प्रयत्न केला आहे. प्रेम कवीला ( जो प्रेमावर आधारित कविता करतो ) भावना शब्द बद्ध करायला कधी प्रेम करायला लागले नाही मी ही त्यातलाच एक छोटा कवी.
सदरील काव्य पुष्प सर्व देव रुपी वाचकांना सादर समर्पित करत असताना कोणत्याही प्रेमी युगल (couple) वा कुठल्याही प्रेमवीराच्या कोमल भावना धक्का पहोचणार नाही याची काळजी घेतली असली तरी ही कविता आणि आपले प्रीत मध्ये साम्य जळून आले तर हा निव्वळ योगायोग समजावा.
जळून येती रशीमगाठी !