जीवनाचा अर्थ काय? या प्रश्नाच्या शोधात माणूस सतत धडपडत राहिला आहे. त्याचा मूळ स्वभाव कोणता आणि जीवनाचे सार्थक कशात आहे, याच्या शोधात मानवजात अविरत धडपडत आहे.
‘Scribblings’ या पुस्तकामुळे कदाचित या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल असे वाटते. शांती आणि सौहार्दाच्या शोधात असलेल्या माणसाच्या अंत: करणाला स्पर्श करण्याची क्षमता या लेखनात आहे. या Scribblings मधील लेखन नक्कीच सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असलेल्या विश्वाची ओळख करून देईल.
हे पुस्तक आपण सहज मनोरंजनासाठीही वाचू शकतो आणि सहज चाळू शकतो.
अनेकांना असे वाटते की, गूढाचे चिंतन करणाऱे हे लेखन माणसाच्या ठिकाणी असलेल्या आंतरिक क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
हे लेखन प्रगल्भ तरीही व्यावहारिक आहे. माणसाच्या ठिकाणी असलेल्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी आणि मुक्त मनाने चिंतन करण्यासाठी हे लेखन खूप उपयुक्त ठरेल.
अपवित्रतेपासून ते पवित्रतेपर्यंत, सांसारिकतेपासून ते गूढतेपर्यंत घेऊन जाणारे हे लेखन खात्रीने आपल्याला वैचारिक आणि आध्यात्मिक मार्गावर नेणारे आहे. झेन् तत्वज्ञानाबद्दलचा सकस विचार तुमच्या परिचयाचा असेलच.
Scribblings हे पुस्तक तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners