अहिराणीत, इतक्या सहज, मनाला नकळत चटका लावून जाणाऱ्या, प्रामाणिक कविता वाचताना त्या इतके दिवस प्रसिद्ध न केल्याची रुखरुख वाटत राहिली.
सुधीर देवरे ज्या सांस्कृतिक वास्तवाचे किनारे शोधू पाहतात, त्यात परंपरेच्या गुंतागुंतीत स्थित झालेल्या समाजाची फार सखोल समजूत आहे.
अहिराणीचा इतिहास लिहिला जाईल त्यात डॉ. सुधीर देवरे यांनी दोन महत्त्वाची पाने तर कमावली आहेतच. यांची प्रतिभा पुढेही झळकावी. त्यात ज्या दुःखाच्या पदरांवर भेदक प्रकाश टाकला आहे, त्याचा पार लाग