योगेश पाटगांवकर ह्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.बी.ए. केल्यावर वीस वर्षांहून अधिक काळ नामांकित कंपन्यांमध्ये वरिष्ठ हुद्द्यावर काम केले. आपल्या ह्या जगभराच्या भ्रमंतीत अनेक अनुभव टिपले. ह्यातूनच नातीगोती आणि आयुष्य ह्यावर काही कविता लिहिल्या गेल्या. ह्या कविता म्हणजे कवीने आपल्या सुहृदांशी केलेलं संभाषण आहे. सध्या योगेश पाटगांवकर हे देशातल्या काही मोजक्या मास्टर सर्टिफाइड कोचेस पैकी एक असून विविध नामांकित आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर सल्लागार म्हणून काम करतात.