दोन कॉलेजवयीन मैत्रिणींच्या पुणे ते गोवा बाईक प्रवासाची थरारकथा आहे "एकदम बिनधास्त"! दुचाकीवरून एवढ्या दूरवर सहलीचा आनंद घेता यावा या सरळ साध्या विचाराने सुरु झालेल्या या प्रवासाने पुढे मात्र वेगळेच वळण घेतले. न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटकेला सामोरे जावे लागले. तेव्हा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुरुंगातून पळून जाण्यापासून ते घोडेस्वारी करून खरा गुन्हेगार रंगेहात पकडून देईपर्यंत वाटेल ती जोखीम पत्करली या जोडगोळीने !
तरुणाईच्या ताज्या भाषेत लिहिलेली ही कथा अलगद तुम्हालाही तुमच्या फॅंटसीत नेऊन सोडेल. कदाचित त्यांनतर शेजारून झुईंग करत कट मारून बाईकवरून जाणारी बिनधास्त तरुणी दिसली की क्षण दोन क्षण तुम्हाला ती कथेतील नायिकाच वाटून जाईल. खरंच कधी प्रसंग ओढावला तर काळानुरूप स्पीडी झालेली ही मॉडर्न चंडी दुर्गा युवती त्या नायिकेइतकं धाडस दाखवू शकेल? गुंडांशी न डगमगता दोन हात करेल? जिथे शक्तीपेक्षा युक्तीने डोकं चालवायचंय तिथे बुद्धिजीवी डावपेचसुद्धा खेळेल?
मनाने तरुण असणाऱ्या कुणाही व्यक्तीला श्वास रोखून धरायला लावेल अशी ही रोमांचक कथा !!