You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palप्रिय वाचकहो , नमस्कार मी योगेश बोरसे , तुम्हा सर्वांचं BGSM PRODUCTION मध्ये स्वागत करतो .
सादर आहे , एक रोमहर्षक, चित्तथरारक रहस्यमय भयकथा ! ' झोका.... ' !
मित्रांनो , कुठलीही घटना जेव्हा घडते , तेव्हा तिच्या मागे काही कार्यकारणभाव असतो . मग ती घटना कितीही शुल्लक असो . आपलं आयुष्य अशाच अनेक घटनांनी भरलेलं असतं ! काही चांगल्या ,काही वाईट !
बऱ्याचदा आपल्या लक्षात ही येत नाही आणि जेव्हा येतं तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो ! अशीच हि एक गोष्ट ! काल्पनिक असली तरी आपल्या समाजातील घटनांचे पडसाद या कथेत उमटत गेलेले आपल्याला दिसतील आणि मनाला भावतील ही !
आणि भयकथा असली तरी उगाच काही तरी लिहायचं , असं ही नाही ! जशी कथा पुढे सरकत जाते ,घटना क्रम उलगडत जातो ,तशा एक एक गोष्टी घडायला लागतात !
मित्रांनो ही कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजन करणे या एकमेव हेतूने लिहिली आहे .
ही भयकथा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या वेळेचा अपव्यय होणार नाही ! याची खात्री आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा ! bgsmproduction@gmail.com या ईमेल वर !
आपला कृपाभिलाषी ,
योगेश वसंत बोरसे
योगेश वसंत बोरसे
प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये हार्दिक स्वागत करतो.
मित्रांनो, मी ही तूमच्या सारखाच ! एक वाचक ! वय वर्ष ४७
लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो का ?अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं !
बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही ! त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या.
अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे !
आपला कृपाभिलाषी,
योगेश वसंत बोरसे
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.