Share this book with your friends

Rashtrawani / राष्ट्रवाणी राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज जीवनकार्य व विचार

Author Name: Sanjay V. Yerne | Format: Paperback | Genre : Others | Other Details

"राष्ट्रवाणी" मानवतेचे महान पुजारी, थोर तत्त्वज्ञ वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवनकार्य आणि साहित्यविचार विषयीचा आढावा घेणारा संपादन ग्रंथ श्रीगुरूदेव स्नेहींच्या अपार सहयोगाने पूर्णत्वास आलेला ग्रंथ होय.  

      सदर ग्रंथाचे संपादन करण्याचा हेतू म्हणजेच महाराजांचे विचार व कार्य विविध लेखकांच्या मनोगतातून उलगडत एकत्रित सार व मनभाव या कार्यातून समस्त जनतेशी, नव्या पिढीला पोहचविण्याचे हे छोटेसे कार्य होय.  

'सिध्दांतरूप तत्त्वज्ञान | लोकांमाजी रूजविल्याविण |'

न होय पंथ द्वेषादिकांचे उच्चाटन | नेहमीकरीता ||   

|| ग्रा-२८ ||

राष्ट्रसंतानी समतेचा आणि ममतेचा विचार दृढ केला. एकंदरीत हा संपादीत ग्रंथ वाचकांना, अभ्यासकांना निश्चितपणे उपयोगी ठरणारा आहे. जयगुरू....! 

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संजय वि. येरणे

      संजय वि. येरणे

   महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण वैचारिक लेखन करणारे साहित्यिक म्हणून ते ज्ञात आहेत. संजय येरणे यांचे आजतागायत 26 पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, बालसाहित्य, लेख अशा संपूर्ण साहित्य प्रकारात त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.

   चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या दूरवरच्या गावात राहून अभ्यासपूर्ण लेखन साकारणारे हे साहित्यिक होत. त्यांच्या 'डफरं' या कथासंग्रहाने त्यांना सर्वत्र नाव मिळवून दिले, तर संत साहित्याचा अभ्यास करीत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावरील जगातील पहिली 'योद्धा' ही सामाजिक कादंबरी निर्माण करीत संताजी महाराजांच्या पत्नी 'यमुना' यांचे जीवनावरही पहिलीच कादंबरी साकार करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

   साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्य संस्थाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. 

Read More...

Achievements

+5 more
View All