Share this book with your friends

Sampruktt Likhan / संपृक्त लिखाण मराठी नियतकालिक

Author Name: Editor Dr. Sudhir Rajaram Deore | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

सहावं सुख

   दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून कोवीड-19 ने मानवी जीवन पूर्णत: नासवून टाकले. अनेक साहित्यिक, लेखक, कवी, गायक आदी कलाकारांसह आपले मित्र, नातेवाईक, तरुण व्यक्ती आपल्यापासून कायमच्या दूर निघून गेल्यात. प्रत्येकाची अशी एक तरी जवळची व्यक्ती या साथीने अचानक हिरावून नेली, की ती व्यक्ती आज हयात नाही यावर अजूनही आपला विश्वास बसत नाही. अशा या वैश्विक मानवी एकता दाखवण्याच्या काळातसुध्दा काही युध्दपिपासू सत्ता पृथ्वीला नष्ट करण्याची भाषा बोलत विध्वंस घडवत राहतात. तर दुसरीकडे धर्माचा बाजार मांडणारे लोक मानवी नात्यांचे ध्रुवीकरण करण्यात मग्न आहेत. मी (म्हणजे नागरिक) धार्मिक- अध्यात्मिक असेल, पण सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी लोक माझ्या धर्माचा भावनिक वापर करत असतील तर मी त्यांना तो का करु द्यावा? राजकारण्यांनो- सत्ताधार्‍यांनो, देशाचा विकास करणे, नागरिकांना विज्ञानवादी बनवत त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणे, रोजगार उपलब्‍ध करणे, किमान जीवनावश्यक सुविधा निर्माण करणे, आरोग्य सुविधा पुरवणे अशी तुमची कामे आहेत- तुमची ध्येयं असली पाहिजेत. धर्माला धर्माच्या पवित्र जागी राहू द्या. तुम्ही विकासाचे राजकारण करावे. नागरिक जोडण्याचे काम करावे, तोडण्याचे नव्हे, व्देषाचे नव्हे! देशातले लोक हे आधी ‘नागरिक’ आहेत, केवळ ‘मतदार’ नाहीत याचे भान ठेवावे. पूर्वी काही विशिष्ट कारणांनी देशात कुठे जातीय- धर्मिय ताणतणाव वाढला तर नागरिक जातीयवादी व्हायचे. परंतु जबाबदार सत्ताधारी, लोकांना भाईचारा शिकवित. आता खुद्द सरकारांत सामील लोक, नागरिकांत भेदभाव करतात आणि नागरिक सत्ताधार्‍यांना भाईचाराच्या चार गोष्टी शिकवतात... कालाय... (अपूर्ण)
   - डॉ. सुधीर राजाराम देवरे, संपादक.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

संपादक डॉ. सुधीर राजाराम देवरे

अंक आविष्कार

आविष्कार         लेखक            

सहावं सुख (संपादकीय)        - संपादक

मुखपृष्ठाविषयी         - संपादक

पोटभाषेची प्राथमिकता         - डॉ. गणेश देवी

स्लावोज झिझेक                 - डॉ. दीपक बोरगावे

स्वप्नासारखा उजेड              - रवींद्र दामोदर लाखे

ग्रेसची सामाजिकता             - डॉ. शशिकान्त लोखंडे

वही : पारंपरिक कविता          - डॉ. सुधीर रा. देवरे

गाव : नवे रंग, नव्या जखमा     - डॉ. कैलास दौंड

आणि चौकट पूर्ण झाली         - लक्ष्मीकमल गेडाम

अहिराणी साहित्य परंपरा        - डॉ. सुधीर राजाराम देवरे

कविता:

लोकनाथ यशवंत, सायमन मार्टिन, श्रीधर तिळवे नाईक, बालम केतकर, प्रमोद मनोहर कोपर्डे, सुजाता महाजन, जोसेफ तुस्कानो,  संतोष पद्माकर, महेशलिलापंडित, लखनसिंह कटरे, पांडुरंग सुतार, अजय कांडर, बालिका ज्ञानदेव, वीरा राठोड, मंदाकिनी पाटील, नेहा भांडारकर, मंदा माणिकराव नांदूरकर, धिरज जाधव, शोभा तितर, सतीश लोथे, कविता पाटील, अंकिता साळवी, नरेंद्र बापूजी खैरनार, विद्या पाटील, रसिका दास्ताने सांगवीकर, शुभम शिरीलता.

Read More...

Achievements

+4 more
View All