Indie Author Championship #6

Share this product with friends

Shringar / शृंगार

Author Name: Vikas Sawant | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .

या विषयावर लिहिण्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे लोकांची range . एका बाजूला हे फारच सपक किंवा बेचव वाटू शकत तर दुसरीकडे अगदीच उथळ सवंग किंवा बिभत्स वाटू शकत . म्हणून एका मध्यम मार्गाने जाण्याचा हा प्रयत्न . तरीही काही ठिकाणी हे थोडे कमी-जास्त होते आहे . इतक variation वाचक सांभाळू शकतील .

Read More...
Paperback
Paperback 199

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विकास सावंत

विकास सावंत हे एक मितभाषी व्यक्ती आहेत . आयुष्यातील कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. वेगळा विचार करण्याची क्षमता हा त्यांचा फार मोठा प्लस पॉईंट आहे. इथे प्रत्येकालाच समस्या आहेत आणि प्रत्येकजण त्यातच गुरफटून राहिला आहे. इथे प्रत्येकालाच बोलायचं आहे पण ऐकायच कोणालाच नाही . त्यांच्याकडे असलेली आणखी एक क्षमता म्हणजे ऐकून घेण्याची क्षमता . त्यांच्या ऐकून घेण्याच्या आणि प्रत्येक समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याच्या क्षमतेमुळे त्यांना इतरांच्या समस्यांच निराकरण करता आलं. कुणाला काही सांगायच तर त्याच्यावर विश्वास हवा . त्यांच्या व्यक्तिमत्वातली आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. अगदी कोणीही म्हणजे परिचित असो किंवा अगदी फार ओळखीचा नसलेला व्यक्तीही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. याचं रहस्य त्यांच्या एकूणच देहबोलीत आणि व्यक्तिमत्वात आहे. 

वेगळा विचार, ऐकून घेता येणे, आणि विश्वासार्हता या गुणांमुळे त्यांना एक चांगला समुपदेशक बनवलं आहे. 

शृंगार या कथेत येणारे विषय हे त्यांच्या वैयत्तिक आयुष्यात घडलेले किंवा त्यांच्यासमोर इतरांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर तसेच इतर काल्पनिक समस्यांवर आधारित आहेत . ते जसेच्या तसे घेतलेले नाहीत . या व्यक्तींच्या खाजगी आयुष्यावर यातून परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन ते फक्त काल्पनिक कथा रूपात रुपांतरीत केलेले आहेत . 

Read More...