आराध्य दिवाळी अंक २०२१, हा सर्वत्र भारतात उपलब्ध आहे. अस्सल महाराष्ट्राचा मराठी दिवाळी अंक. ज्यात १४ कथा, लघुकथा आणि अनुभव असून एक उत्कृष्ठ दिवाळी अंक इतर दिवाळी अंकांच्या तोडीसतोड उतरेल ह्यात काहीच शंका नाही. ह्या अंकातील सर्व साहित्य रचना मराठी संस्कार आणि मराठी अस्मिता यालाच धरून मांडली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, आकाश कंदीलाच्या मंद उजेडात, उटणाच्या गंधात आणि फराळाच्या चवी चवीने कथा मैफिली वाचूया नी दिवाळी पहाट मनात रंगवूया. नवीन नात्यांना, अनुभवांना आणि नवीन साहित्याला आपलेसे करूया.... आराध्य साहित्य संग्रहा तर्फे हा प्रकाशित केलेला दुसरा दिवाळी अंक असून अत्यंत उस्फुर्त प्रतिसाद वाचकांकडून मागील वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मिळत आहे. हा दिवाळी अंक इतर दिवाळी अंकापेक्षा काहीसा वेगळा आहे. त्यात जाहिरातबाजी नाही, इतर विषयांतर करणारे विषय नाहीत. तर त्यात आहेत केवळ कथा आणि साहित्य. मागच्या वर्षी २०२० मधील दिवाळी अंकासाठी लिहिणारे जे लेखक / लेखिका होते. त्यातील काही ह्यावर्षी देखील नवीन कथांचा नजराणा घेऊन आपल्यासाठी आले आहेत. तर नवीन लेखक मंडळींची देखील भर ह्यात आहे. यंदा देखील आम्हाला भरभरून कथा साहित्य आले. पण इतके सारे साहित्य प्रकाशित करणे शक्य नसल्याकारणाने आराध्य साहित्य संग्रह टीम द्वारे काही ठराविक आणि निवडक लेखकांची निवड करून त्यांचेच साहित्य ह्या दिवाळी अंकासाठी छापले आहे
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners