आराध्य घोस्ट स्टोरीज हा त्रैभाषिक विशेषांक असून हा २५००० हुन अधिक शब्द संख्या असलेला भयकथा संग्रह आहे. त्यात पहिली कथा इंग्रजी मध्ये आहे. WHO IS THERE?! - Author : Sally Sason ह्यांनी त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शब्दांतून वाचकाला नक्कीच खिळवून ठेवेल ह्यात तिळमात्र शंका नाही. कथा वाचून झाल्यावर देखील मनात बराच वेळ तेच प्रसंग डोळ्यासमोर रेंगाळत राहतात हा अनुभव आम्हाला आला तू तुम्ही वाचकांनी देखील नक्की घ्या.
कथा: खूनी चण्डालन - लेखक : देवेन्द्र प्रसाद [हिंदी कथा] ह्या हिंदी कथेत लेखकाने अत्यंत जागृत आणि भयानक प्रसंग हुबेहूब जिवंत केले आहेत. ह्या कथेतील गूढ आणि रहस्यमय रचना, मांडणी यातून कथा प्रत्यक्ष समोर घडतेय याचा प्रत्येय येतो.
झोपाळा - लेखिका: तेजल भोईटे [मराठी कथा] हि एक थरारक कथा असून कथा वाचून अंगावर काटा येतो. अप्रतिम कल्पनाशक्ती आणि उत्कंठा वाढवणारी भयकथा आहे.
अमावस्या - लेखिका: चैत्राली सुमेश चिनकटे [मराठी कथा] हि कथा उत्तम मांडणी आणि उत्कृष्ट कथानक यासाठी नक्कीच वाचकांना खिवळून ठेवेल.ह्या कथेत प्रसंग फारच थरारक आणि कुठेही न थांबता अगदी शेवटपर्यंत वाचकाला घाबरवून सोडते.
फरसाण - लेखक : नितेश ठोकळ [मराठी कथा] ह्या कथेत एकूण कथेचे ८ भाग आहेत. त्यातील ६ भाग आराध्य साहित्य संग्रह ऍप मध्ये पूर्वप्रकाशित केले आहेत. पण भाग ७ आणि ८ हे केवळ ह्या विशेषांकातच प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच कथा एक हिवाळी रात्र - लेखक : नितेश ठोकळ [मराठी कथा] हि देखील तितकीच भयानक आणि रोमांचकारक आहे जितकी बाकीच्या कथा आहेत. खिडकी - लेखक: नितेश ठोकळ [मराठी कथा] ह्या कथेत खिडकी प्रकरण काय आहे ते जरूर वाचा.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners