माझ्याकडून एक छोटासा संदेश -
माझं नाव लीना परांजपे आहे आणि या प्रवासात मी तुमचं मार्गदर्शन करणार आहे.
मी गेली 33 वर्षं विवाहित आहे आणि या काळात लग्नातले अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.
इतर मॅरेज प्रोफेशनल्ससाठी हा एक क्लिनिकल दृष्टिकोन असतो, पण माझ्यासाठी लग्न वाचवणं हे वैयक्तिक आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यातले अनुभव हेच मला मॅरेज कोच बनण्यामागचं कारण ठरले.
डेटिंग बिघडलेलं नाही — आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गोंधळलेला आहे. पर्यायांनी आणि आवाजांनी भरलेल्या या जगात, प्रेम आजच्या काळात अधिकच गुंतागुंतीचं झालंय. आपण सतत स्वाइप करत राहतो, पटकन प्रेमात पडतो आणि तितक्याच लवकर तुटूनही जातो. एक रिलेशनशिप कोच म्हणून मी अनेक तरुणांना पाहिलंय —जे शांतपणे, एकटेच, शंका, ब्रेकअप आणि भावनिक थकव्याशी झुंजत असतात आणि हे चालू राहणं मी पाहू शकले नाही. हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी कधी तरी स्वतःला हे विचारलंय —“हे खरंच प्रेम आहे, की मी फक्त एखाद्या सवयीशी जोडलेला/ली आहे?”
“इतकं साधं काहीतरी एवढं कठीण का वाटतं?” “फक्त मीच का हरवलेला/ली आहे?” तुम्हाला कोणी ‘फिक्स’ करावं अशी गरज नाही. तुम्हाला हवे आहेत — योग्य प्रश्न, थोडी स्पष्टता आणि एक safe space जिथे कोणीच तुम्हाला judge करणार नाही तर समजून घेईल.
हे पुस्तक तुमच्यासाठी आरश्यासारखं प्रतिबिंब आहे, तुमचं मार्गदर्शन करणारं साधन आणि तुमच्यासाठी एक वेक अप कॉल. मी हे पुस्तक तुम्हाला बदलण्यासाठी लिहिलं नाही —तर जोपर्यंत हातातून वेळ जात नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची दिशा ओळखावी, यासाठी लिहिलं आहे.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners