आईवडील होणं हे निसर्गाचं वरदान आहे. पण पालक होणं ही एक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच पालकत्व शिकणं गरजेचं आहे. आई झालं, वडील झालं म्हणजे पालकत्व आपोआप अंगी बाणत नाही. ते प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं. या पुस्तकातून अगदी बाल्यावस्थेपासून ते वयात येणाऱ्या मुलांपर्यंत प्रत्येक पायरीवर पालकांनी नेमकं काय करायला हवं याविषयी सखोल मार्गदर्शन मिळेल.