मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच स्वतःहून प्रगत यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पुर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम बुद्धिमत्ता” अर्थात “आर्टीफिसियल इंटेलीजंस” संक्षिप्तरूपाने ‘ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम अथवा यांत्रिक” अशी संबोधली जाणारी बुद्धिमत्ता मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा सिद्ध होऊ पाहत आहे. खरे तर ‘ए.आय.’ चे नामकरण झाले १९५६ मध्ये. तसे त्याचे बिज़ारोपण १९५० मध्येच जटिल समस्या सोडवण्यासाठी व सांकेतिक पद्धतिसाठी आणि पुढे १९६० मध्ये अमेरिकी संरक्षण विभागाने तर १९७० मध्ये दारपा (DARPA) रस्ते नाकाशा निर्मितिसाठी, जो पुढे २००३ मध्ये स्वियसहाय्यक यंत्रणा म्हणुन वापरला गेला. आधुनिक तंत्रज्ञानाने मानवी जीवन उतरोत्तर सुसह्य बनविले आहे. हॉलीवुड-बॉलीवुड सिनेमांमध्ये अतिरेकाने मनोरंजनात्मक भ्रामक कल्पना दाखवितात तसे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विघातक नक्कीच नाही. ते जगाचे उज्वल भविष्य घडू पाहत आहे. विचार करा कि आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशात देखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरू शकता. भविष्यातील इंटरनेटमध्ये फक्त पृथ्वीवरील मानव, वस्तू आणि संसाधनेच नाही तर चंद्र, मंगळ किंबहुना संपूर्ण गॅलेक्सी जोडण्याचे सामर्थ्य असणार आहे. अतिशयोक्ती वाटते ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये! कारण..