छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही समस्त मराठी जनांशी भावनिक नाते जुळलेली एक ऐतिहासिक व्यक्तीरेखाच होय. या तलवारीच्या इतिहासासंबंधाने अनेक मत मतांतरे असल्याने ती आजही एक रहस्य बनून राहिली आहे. भवानी तलवारीच्या इतिहासावरील गूढ वलय दूर व्हावे या प्रामाणिक भावनेतून ऐतिहासिक साधने व संदर्भ ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास करुन इतिहास भवानी तलवारीचा हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. या पुस्तकात भवानी तलवारीचा इतिहास, वर्णन, उगमस्थान, ऐतिहासिक उल्लेख व चित्ररूप दर्शन असे वैविध्यपूर्ण विषय मांडण्यात आले आहेत. शिवकालीन इतिहासावर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या पसंतीस हे पुस्तक उतरेल असा विश्वास आहे.