जीवन हे एक रहस्यच आहे. कधी सुख तर कधी दु:ख हे जीवनाचे सूत्रच आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हवी. आपली निर्णय घेण्याची क्षमताच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असते. यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हवी आणि आनंदी जीवनासाठी उत्तम विचार हवेत. या दृष्टीकोनातून सदर लेखात मांडलेले उत्तम विचार आपले जीवनध्येय पूर्ण करुन सुखी व यशस्वी जीवन जगण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील असा विश्वास आहे.