आधीच्या पिढीतील एका मध्यमवर्गीय दाम्पत्याने वयाच्या २० ते ४० ह्या दरम्यान (साधारण १९६५ ते १९८५) आपापली अनुभूती त्या त्या वेळेला काव्यरुपात मांडून ठेवली होती. तीन मजली चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात, रोज पहाटे चार वाजता साधारण एक किलोमिटरवरनं सात जणांच्या कुटूंबासाठी लागणारं पाणी बादलीतून भरून आणण्यापासून सुरू झालेला संसार शेवटी ग्राऊंड प्लस वन, थ्री बीएचके बंगल्यापर्यंत जाऊन पोहोचला.
ह्या त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना आलेली अनूभूती आणि त्यांनी जोपासलेली कला आज पुस्तकरुपाने प्रकाशित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
- पराडकर कुटूंबीय.