या कादंबरीमध्ये मारवी ह्या भयंकर अश्या आजाराचे निदान करण्यापासून ते ह्या रोगाची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चिकित्सा करणाऱ्या एका प्राध्यापकांची कथा आलेली आहे. साथीचे रोग म्हटले कि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांना हेलावून टाकणाऱ्या गोष्टी घडतातच ह्या सर्व बाबीचा मागोवा घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे. साथीचे रोगामुळे अनेक प्रकारचे नुकसान जरी होत असले तरी, असा काळ माणुसकी शिकवून जातो हे मात्र मान्य करावेच लागेल. नुकतेच क्रिस्पर या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात जन्म झाला आहे आणि प्रत्येकाला वाटत आहे कि ह्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही असाध्य आजारावर उपचार करणे शक्य होईल याच बाबीला पकडून या कादंबरीचे लिखाण करण्यात आले आहे, वाचक ह्या पुस्तकाचे स्वागत करतील हीच सदिच्छा...